आमदार निवासाच्या कँटिनमध्ये राडा शिंदेच्या आमदाराची कर्मचाऱ्याला मारहाण
मुंबई/सत्ता आणि आमदारकीच्या जोरावर मुजोरी दाखवित कोणावरही हात उगारणारे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात निकृष्ट जेवण मिळाल्याच्या कारणावरून तिथल्या कामगाराला मारहाण केली. विधानसभा. अधिवेशन काळातच गायकवाड यांच्या या गुंडागर्दी बद्दल संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असून गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.दरम्यान या घटनेचे अधिवेशनात् तीव्र पडसाद उमटले….
