असा घडला बाळासाहेबांचा ‘सामना’ !. . . . .
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. त्यांच्या बरोबर सहा वर्षापूर्वी म्हणजे 1960 साली 13 ऑगस्टला बाळासाहेबांनी संपूर्ण व्यंगचित्राला वाहिलेले,(जगातील पहिले असं म्हटलं तरी चालेल) मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरु केलं. स्वतः उत्कृष्ट व्यंगचित्रकार असल्यानं आणि वडील प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे उर्फ दादा यांच्या मार्गदर्शन आणि…
