आरसीएफ जवानांचा जयपूर -मुंबई एक्स्प्रेस मध्ये गोळीबार- रेल्वे पोलीस अधिकार्यांसह ४ ठार
पालघर – जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या(आरपीएफ) जवानाने गोळीबार केला. त्यात आरपीएफच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह चौघांचा मृत्यू झाला. वापी स्थानकावरून रेल्वे सुटल्यानंतर पहाटे या जवानाने तीन डब्यांमध्ये फिरून एकूण १२ गोळ्या झाडल्या. त्यानंतर गाडीची चेन ओढली आणि आरोपीने मिरा रोड स्थानकावर गाडी थांबल्यावर उडी मारली. तेथील रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेनंतर…
