संतांनी मानवी मूल्यांचा जागर केला तोच संविधानाचा गाभा झाला
ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नरमंगळूरपीर (प्रतिनिधी) : जाती-धर्माच्या आणि वर्णाच्या आधारे रुजविलेली वीषमता दूर करून मानवी मूल्यांचा जागर संतांनी केला. तीच मूल्य पुढे संविधानाचा गाभा झाली, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार, ज्येष्ठ पत्रकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले. भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधूत्व ही मूल्य आपल्याला संत साहित्यात दिसतात, असेही ते म्हणाले. संविधान दिनानिमित्त पाथ फाऊंडेशनच्या…
