मुंबईतील चार लाख ८० हजार रेशनकार्ड सह महाराष्ट्रातील अठरा लाख बोगस रेशनकार्ड रद्द
मुंबई /राज्यात सध्या बोगस रेशन कार्ड विरुद्ध मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे उत्पन्नाची खोटी माहिती देऊन सरकारच्या अन्नधान्यावर डल्ला मारणाऱ्या, बोगस कार्डधारकांचे कार्ड रद्दबातल केले जात आहे. ज्यात आतापर्यंत राज्यात १८ लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आली असून, अजून दीड कोटींहून अधिक कार्डधारकांची ई-केवायसी प्रलंबित आहे.गोरगरीब आणि वंचित गटाला सरकारी अन्नधान्याचा लाभ व्हावा, यासाठी…
