एकनाथ खडसे पुन्हा भाजपात – मुलगी रोहिणी मात्र राष्ट्रवादीतच
जळगाव – एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे येत्या १५ दिवसात भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. तर दुसरीकडे खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी शरद पवारांच्या पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेणार आहेत.भा जपकडून…
