;मुंबई, दि. (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी हे गुरुवार, २ डिसेंबर २०२१ रोजी ८५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे एकमेकांना भेटणे शक्य नव्हते. आता वातावरण थोडेफार निवळत आहे. डॉ. मनोहर जोशी यांनी आपल्या ८४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रसार माध्यमातील बंधुभगिनींशी सुसंवाद साधण्याची इच्छा दर्शविली असून ते दादर (पश्चिम) येथील कोहिनूर मधील आपल्या कार्यालयात गुरुवार, २ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या दरम्यान हा सुसंवाद साधतील, अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
Similar Posts
राज्यपालांच्या विरुद्ध ओबीसी मध्ये असंतोष
पुणे/महाराष्ट्र सरकार साठी डोकेदुखी ठरलेले राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आता ओबीसी समाजाचा राग ओढवून घेतलेला आहे कारण सावित्री बाई फुले यांच्या जयंती दिवशीच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहून पुतळ्याचे अनावरण करण्यास राज्यपालांनी नकार दिल्यामुळे ओबीसी विद्यार्थी संघटनांनी रस्त्यावर उतरून राज्यपालांच्या विरोधात घोषणा देत तीव्र आंदोलन केले.ज्या माऊलीने तत्कालीन वर्ण व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवून…
उमेशपाल हत्याकांडात बाहुबली अतिक अहमदचा हात ? आरोपीच्या घरांवर योगी बाबांचा बुलडोझर
प्रयागराज – बसपा आमदार राजू पाल याच्या हत्या प्रकरणातील एक प्रमुख साक्षीदार उमेश पाल याची नुकतीच हत्या करण्यात आली आहे. त्याच्या सोबत त्याच्या चलकाचीही हत्या झाली आहे या हत्याकांडात सध्या साबरमती तुरुंगात बंदिस्त असलेल्या बाहुबली माफिया अतिक अहमद याचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या पत्नी आणि भावाला अटक केली आहे. तर मुलाचा…
गुजराती नाम फलकाची पाटी तोडणाऱ्या विरोधात भाजपचे आंदोलन
मुंबई : मुंबईत गुजराती पाट्यांचा वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. घाटकोपरमध्ये काही दिवसांपूर्वी गुजराती भाषेत असलेल्या ‘मारू गुजराती’ या पाटीची तोडफोड केली असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तोडफोडीविरोधात भाजप आक्रमक झाली असून गुजराती पाटी असूच नये असा नियम आहे का, असा सवाल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.घाटकोपर पूर्वमधील आर बी मेहता मार्गावरील गुजराती नामफलक फोडल्याने…
आई वडिलांविषयी अश्लील कॉमेंट्सयुट्यूबर रणवीरवर गुन्हा दाखल
मुंबई – मी आई- वडिलांचे लैंगिक संबंध बघायचो असे संतापजनक विधान केल्या प्रकरणी देशात संतापाची लाट उसळली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर गुन्हा दाखला करण्याचे आदेश दिले आहेत तसेच मानवाधिकार संस्थेनेही त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहेयुट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्या अडचणींमध्ये आणखी भर पडल्याचं दिसून येतं आहे. कारण आता आसाम या राज्यात रणवीर, आशिष चंचलानी,…
निशाणी आणि नाव असले काय नसले काय बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचा आहे – राज ठाकरे
मुंबई/ मी शिवसेना सोडली पण त्याच्याशी शिंदे,राणे आणि भुजबळ यांच्या तुलना करू नका .निषणीसाठी सध्या भांडत आहेत पण माझ्यासाठी निशाणी असली काय किंवा ननसली काय मला फरक पडत ने कारण माझ्याकडे बाळासाहेबांचा विचार आहे आणि तो विचारच मला पुढे न्यायचा आहे असे मनसे अध्यक्ष राजं ठाकरे यांनी काल सांगितले यावेळी त्यांनी उद्वव ठाकरे यांना सवाल…
दावूद वर 25 लाखाचे इनाम .
दिल्ली/ ज्याने मुंबईत बॉम्ब स्फोटाची मालिका घडवून 257 लोकांचा जीव घेतला ज्याला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करून त्याच्यावर 200 कोटींचे इनाम लावले आहे त्या दावूद वर एन आय ए सारख्या तपास यंत्रणेने फक्त 25 लाखाचे इनाम लावले आहे एवढ्या कमी रकमेत दावूद चा ड्रायव्हर किंवा प्यून सुधा एन आय ए च्या हाती लागणार नाही अशी…
