मुंबई, दि. (प्रतिनिधी) : तीन दिवसांपूर्वी मुंबईतील मालवणी परिसरात रहाणा-या एका हिंदू युवतीला फसवून मुस्लिम समाजातील एका युवकाने पळवून नेल्याचा प्रकार घडला. घडलेला प्रकार कांदिवली पोलिस ठाण्याचे अति.आयुक्त. प्रविण पडवळ यांना भाजपाचे वरिष्ठ नेते आर. यु. सिंह यांनी निदर्शनास आणून देताच ह्या कार्यक्षम आधिका-याने आपली सर्व शक्ती -युक्ती कामाला लावत अवघ्या तीन दिवसांत ह्या पळवून नेलेल्या युवतीला हैद्राबाद येथून सहीसलामत सोडवून तिच्या आई-वडिलांच्या हाती सूपूर्द केले. अति.आ.प्रविण पडवळ यांनी दाखवलेल्या चातुर्याबद्दल नुकताच खासदार गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा त्यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार केला. राजकीय जीवनांत काम करत असतांना पोलिसांबरोबर अनेक वादाचे प्रसंग येतात परंतु चांगले कामे करणाऱ्या पोलिस आधिकाऱ्यांचे कार्य समाजापुढे येणेही तितकेच गरजेचे आहे. या वर्षभरात अशाप्रकारे फसवणूकीचे १०३ प्रकार घडले असून त्या पैकी ७८ युवतींना यातून सोडवण्यात मुंबई पोलिसांना यश आले असल्याची माहिती पडवळ यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांना दिली. मुंबईच्या बिघडलेल्या कायदा व सुरक्षे बद्दल चिंता व नाराजी व्यक्त करुन मुंबईतल्या कायदा व सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी प्रविण पडवळ यांच्या सारख्या कार्यक्षम पोलिस अधिकाऱ्यांची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार गोपाळ शेट्टी यांनी या सत्कार प्रसंगी बोलतांना केले. चांगल्या कामांसाठी पोलिस व लोकप्रतिनिधींनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे, असेही मत शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. तरुण युवतींची फसवणूक टाळण्यासाठी सर्वच पालकांनी दक्षता घ्यावी, असेही आवाहन शेट्टी यांनी केले आहे.
Similar Posts
साकीनाका बलात्कार प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाचे महाराष्ट्र सरकारवर ताशेरे
मुंबई – साकीनाका बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे कारण बलात्कारी माथेफिरूणे पिढीत महिलेच्या गुपतागत रोड घातल्याने दिल्लीतील निर्भया बलात्कार प्र्क्रनाची आठवण ताजी केली .त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने या भयंकर प्रकरणाची गंभीर दाखल घेतली आहे काल महिला आयोगाच्या पथकाने त्या दुर्दैवी महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली .त्यानंतर प्र्सारमध्यमाच्या प्र्तिंनिधींजवळ या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त्र करून महाराष्ट्र…
मुंबईत पुन्हा सामूहिक बलात्कार
मुंबई/ गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नसल्याने बलात्काराच्या सारखे गुन्हे पुन्हा पुन्हा घडत आहेत काल भल्या पहाटे गोवडीच्या शिवाजी नगर भागातील रोड क्रमांक १३येथे चार तरुणांनी कॅट्रिंगचे काम करणाऱ्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला ती रस्त्याने जात असताना एका ओळखीच्या तरुणाने तिला जवळच असलेल्या खोलीत नेले .त्याच्या पाठोपाठ अन्य तिघे आत गेले आणि…
ऑर्केस्ट्रा बारच्या परवानगी बाबत झोन एक-दोन आणि तीन पोलिसांकडून भेदभाव ?
मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने महाराष्ट्रात ब्रेक द चेन अंतर्गत बहुतेक उद्योग धंद्यांना परवानगी देण्यात आली आहे .यात दारू आणि ऑर्केस्ट्रा बार चाही समावेश आहे . मात्र असे असतानाही मुंबईच्या पोलिस झोन 1 – 2 आणि 3 झोन मधील ऑर्केस्ट्रा बारना अजूनही परवानगी देण्यात असलेली नाही अशी माहिती सूत्रा.जर मुंबईतील चार आणि…
दाऊद पुन्हा भारतात मोठ्या घातपाताचा तयारीत ?
मुंबई/ सध्या पाकिस्तानात लपून बसलेल्या माफिया डॉन दाऊद इब्राहिम याला भारतात आणण्याच्या हालचालींना एन आय ए कडून वेग आला आहे तसेच दाऊदचे भारतातील फायनान्सर तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याने दाऊद चिडला असून त्याने भारतात पुन्हा भयंकर दहशत मजवण्याचा कट रचला असल्याची माहिती भारतीय गुप्तचर संस्थांनी मिळाली आहे. त्या नुसार भारतात बॉम्ब स्फोट करण्यासाठी त्याने एक स्पेशल…
धक्कादायक! रक्ताच्या नात्याला काळीमा -भावा बरोबरच्या लैंगिक संबंधातून बहीण गर्भवती
मुंबई/ आजकालच्या मुलाना काय झालाय कुणास ठाऊक अश्लीलतेचा विकृत व्हायरस आता लहान मुलांमध्ये सुधा पसरत चालला आहे. कारण मुंबईच्या कुरार भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक १६ वर्षाच्या मुलीने आपल्याच अल्पवयीन १३ वर्षाच्या भावाशी लैंगिक संबंध ठेवले आणि त्यातून ती गर्भवती राहिली रक्ताच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत…
नेरळमधे पैशाने भरलेली पर्स रेल्वे कर्मचाऱ्यांनी केली परत! सीसीटीसी विनोद दळवी यांचाच प्रामाणिकपणाचे कौतुक!
रायगड(धर्मानंद गायकवाड):- कर्जत तालुक्यांतील मध्य रेल्वेचा नेरळ येथिल रेल्वे स्टेशन नंबर ३ वर बुकिंग ॲाफीसवर आज मुंबई हायकोर्टाचे वकील ॲड. गिताबाई साळुंखे यांची पैशाने भरलेली पर्स आणि त्या मध्ये असलेले डेबिट आणि क्रेडिट कार्ड येथिल रेल्वेमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी श्री. विनोद दळवी यांच्या मार्फत त्यांना नुकताच सुखरुप मिळाली आहे. त्यामुळे नेरळ स्टेशन व परीसरात सर्वत्र…
