मुंबई, दि. (प्रतिनिधी) : माझी जन्मभूमी नंदुरबार असून माझी कर्मभूमी अंबरनाथ आहे. व्यावहारिक आणि व्यावसायिक गरज म्हणून मी आणि मुकुंद कुलकर्णी मुंबईच्या सागरात पोहत असलो तरी आणि शरीराने जरी मुंबईत असलो तरी मनाने आम्ही अंबरनाथ मध्येच आहोत. त्यामुळे ज्या ज्या व्यासपीठावर संधी मिळेल त्या त्या ठिकाणी आम्ही अंबरनाथची बाजू, प्रश्न विविध प्रकारचे मुद्दे मांडत असतो. त्यामुळे अंबरनाथकरांनी आज आमचा सन्मान केला हा आम्ही आमच्या घरच्या माणसांनी केलेला सन्मान समजतो आणि घरच्या माणसांनी सन्मान करुन आमच्या पाठीवर कौतुकाची, शाबासकीची मारलेली थाप आणि हा सन्मान हा आम्हाला भारतरत्न, पद्म पुरस्कारासमान निश्चितच वाटतो, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करुन अंबरनाथ शहराचे नांव उज्ज्वल करणाऱ्या प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा अंबरनाथ शहर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, अंबरनाथ तर्फे आयोजित करण्यात आला होता. कोकण नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष, अंबरनाथ जयहिंद बँकेचे संस्थापक विलासराव देसाई, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांचा सेवानिवृत्त सरकारी अधिकारी सुभाष काळे, मोरेश्वर पटवर्धन, राजेंद्र परोळसांदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलतांना योगेश त्रिवेदी म्हणाले की, सत्कार बरेच होतात, पुरस्कार सुद्धा मिळतात परंतु घरातील आपल्या माणसांनी आपल्या पाठीवर मारलेली कौतुकाची, शाबासकीची थाप ही मौल्यवान असते त्यामुळे अंबरनाथ शहर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने केलेला आमचा सन्मान हा भारतरत्न, पद्म पुरस्कार इतकाच महत्त्वाचा वाटतो. अंबरनाथ शहर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे झोमणशेठ अध्यक्ष असतांना मी उपाध्यक्ष होतो आणि पुण्याला महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अधिवेशन होते. कालनिर्णय कार ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर हे अध्यक्ष आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रतापराव गोडसे हे कार्याध्यक्ष होते. झोमणशेठ आणि मी अशा आम्ही दोघांनी अंबरनाथचे प्रतिनिधित्व त्या अधिवेशनात करुन गणेशोत्सव साजरा करतांना आपली संस्कृती, परंपरा कशी जतन करावी, याची साग्रसंगीत माहिती जाणून घेत अंबरनाथ मध्ये ती देण्याचा प्रयत्न केला. अंबरनाथ चे प्रश्न सोडविण्यासाठी माझ्या पत्रकारितेचा उपयोग करुन घेतला. शिवमंदिर पर्यटन केंद्र करणे असो की कल्याण महानगरपालिका क्षेत्रातून अंबरनाथ वगळण्याचा नऊ वर्षांचा संघर्ष असो, की शिवदर्शन बंगला पुनश्च अंबरनाथ मध्ये आणणे, अंबरनाथ तालुका निर्मिती अशा अनेक महत्वपूर्ण विषयात सहभाग घेतला. एक अंबरनाथकर म्हणून आपण कधीही हाक मारा, मी आणि मुकुंद कुलकर्णी तुमच्या हाकेला प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही, असेही योगेश त्रिवेदी यांनी आवर्जून नमूद केले. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतांना काम करीत राहणे हे महत्त्वाचे आहे. टीकाकार टीका करीत राहतील पण आपण ते मार्गदर्शन म्हणून पहायला हवे, लोकांचा सहभाग जास्तीत जास्त कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना मुकुंद कुलकर्णी यांनी केली. मंडळाचे अध्यक्ष मोरेश्वर पटवर्धन, उपाध्यक्ष संतोष दबडे, पांडुरंग जवादे, हेमलता गांगल, वसुंधरा वझे, सरचिटणीस राजेंद्र परोळसांदे, पदाधिकारी सचिन वैद्य, भगवान सासे, विजयन नायर, गणेश शेटे, ललित बकरे, बाळा दलाल, पौरोहित्य करणारे चंद्रकांत भास्कर कुलकर्णी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. हा उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला. राजेंद्र परोळसांदे यांनी आपल्या भावना पोटतिडकीने मांडून हा ६९ वा उत्सव शतकोत्तर होवो आणि त्यासाठी सर्वांनी हिरीरीने सहकार्य करावे असे आवाहन केले. या महोत्सवात आमदार डॉ. बालाजी किणीकर, पूर्णिमा कबरे, हेमंत गोगटे, किसनराव तारमळे, शोभा शेट्टी आदी मान्यवरांच्या हस्ते विशाखा सुभेदार, सिद्धी गंगावणे, पायल कबरे, किरण माने, सुधीर टाकळकर, डॉ. समीर कुलकर्णी, राजेंद्र कर्णिक, शीतल जोशी, मनीषा वाळेकर, डॉ. मनोज कंदोई, प्रदीप ताम्हाणे, सागर जाधव, मोहन कुलकर्णी, अविनाश सुरसे, सुशील दलाल आदी प्रतिभावंतांचा सन्मान करण्यात आला.
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयजरंडेश्वर ची साखर अजितदादांना कडू
मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1200 कोटींचा जरंडेश्वर साख़र कारखाना घोटाळा सिद्ध झाला असल्याचा दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे. कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली होती.ही कारवाई योग्य असल्याची मान्यता कोर्टाने दिली आहे. हा कारखाना शेतकर्यांचा ताब्यात द्या, अशा आग्रह भारत सरकार आणि ईडीचा असल्याचे किरीट सोमय्या यांनी आहे. त्याच्या या वक्तव्याला आता राष्ट्रवादीचे…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईदरेकर यांच्यावर गुन्हा दाखल तर फडणवीस हे सुधा पोलिसांच्या रडारवर
अधिवेशन काळातच विरोधी पक्षनेते अडचणीतमुंबई/ विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच दोन वेग वेगळ्या प्रकरणात दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांवर गुन्हे दखल होणार आहेत त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते फडणवीस अडचणीत आले आहेतदेवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाचे नेते अनिल गोटे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे…
पायरी सोडणाऱ्यांचा नाद सोडा
सध्या भारतीय राजकारणात सज्जन आणि नीतिमत्ता जपणारे लोक दुर्मिळ झालेत त्यामुळे लोकशाहीचे काही खरे नाही पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांचे पायऱ्या वरचे जे घाणेरडे राजकारण बघायला मिळतेय ते संतापजनक आहे त्यामुळे अशा लोकांना आमचे लोकप्रतिनिधी म्हणायची सुधा आता लाज वाटायला लागली आहे. महाराष्ट्र सारख्या प्रतिभाशाली राज्यात असे लोकप्रतिनिधी निर्माण व्हवेत हे खरोखरच महाराष्ट्रातल्या साडे…
संदीप बाळासाहेब बर्गे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
मुंबई/ मुंबई जनसत्ता साप्ताहिक आणि न्यूज पोर्टल चे संपादक किसनराव जाधव यांचे मेव्हणे संदीप बाळासाहेब बर्गे यांचे २७ जानेवारी रोजी वयाच्या ३५ वया वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले ते बेस्ट विभागात कामाला होते.अत्यंत शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचे असलेले संदीप बर्गे यांचं अत्यंत कमी वयात निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआघाडी सरकार मधील गृहकलह
आघाडी सरकार म्हटल की त्याला अनेक मर्यादा असतात कारण एकापेक्षा अनेक पक्षाच सरकार चालवताना तारेवरची कसरत करावी लागते.सध्या केंद्रात आणि राज्यात सुधा आघाडी सरकार आहे.केंद्रात भजपाचे बहुमत असेल तरी सरकार मात्र एन डी ए आघाडीचे आहे पण भाजपा बहुमतात असल्याने मोदींची एकतर्फी हुकूमत सुरू आहे पण महाराष्ट्रामध्ये मात्र तसे नाही महारष्ट्र मध्ये जरी तीन पक्षाच्या…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईऑनलाईन धर्मांतराचे महाराष्ट्र कनेक्शन
मुंबई – मोबाईल ऍप च्या माध्यमातून धर्मांतर करण्याच्या प्रकरणाची आता चौकशी सुरु झालेली असतानाच या चौकशीत आता धर्मांतराचे कनेक्शन महाराष्ट्राशी असल्याचे उघडकीस आले आहे.ऑनलाईन धर्मांतर करणाऱ्या मुख्य आरोपीची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. महाराष्ट्रातील मुंब्य्रात 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याचं आरोपीने जबाबात सांगितलेय. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरु आहे. ऑनलाईन गेमिंगचा वापर करुन…
