तुकाराम मुंढे यांचा बडगा! बाजारात सुट्टे मसाले विकण्यास पूर्णपणे बंदी, नियमांचे उल्लंघन केल्यास थेट ‘मकोका’
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारात सुट्टे मसाले विक्री करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. आता केवळ वैध अन्न परवाना असलेल्यांनाच मसाले विक्री करण्याची परवानगी असेल, अशी घोषणा एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली आहे. दूध उत्पादनांनंतर आता मसाला उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार हळद, तिखट,…
