यारों का यार… संदीप
आयुष्यात मित्र खूप भेटतात. काही चहाच्या कपाबरोबर संपतात. काही व्हॉट्सॲपच्या ‘गुड मॉर्निंग’पुरते उरतात. काही निवडणूक आली की जवळ येतात आणि निकाल लागला की मोबाईलच्या नेटवर्कसारखे गायब होतात. पण काही मित्र असे असतात, ज्यांच्यासाठी ‘मित्र’ हा शब्दच जरा छोटा पडतो. माझ्यासाठी संदीप चव्हाण तस्साच आहे.माझा परममित्र. माझा जिवलग. माझा यारों का यार! या माणसाच्या जिभेवर साखर…
