मुंबई मराठी पत्रकार संघ-वय वर्षे ८५, पण अजूनही बातमीच्या शोधात धावणारा
मी, मुंबई मराठी पत्रकार संघ. आज माझा ८५ वा वाढदिवस म्हणजेच वर्धापन दिन.वाढदिवस म्हटलं की लोकं केक कापतात. माझ्या बाबतीत मात्र लोकं विश्लेषणं कापतायत.कोणी म्हणतं, हा ८५ वर्षांचा म्हातारा झालाय.कोणी म्हणतं, अहो, हा अजूनही तरुण आहे.कोणी माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगतं, मराठी पत्रकारितेची संस्कृती जपणारं हे शेवटचं केंद्रस्थान.तर काही जण मला अडगळीत पडलेल्या जुन्या टायपरायटरसारखं…
