फडणवीस सरकारचा मोठा निर्णय- सरकारी जागेची परस्पर मालकीनोंदवणाऱ्यांना दणका
भाडेपट्टा नोंदीवर आता‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार ! भाडेपट्टाधारकांची नावे ‘इतर हक्कात’ नोंदविणार तीन महिन्यात नोंदी अद्ययावत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई, राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या भाडेतत्वावरील शासकीय जमिनीवर स्वतःचीच मालकी सांगणाऱ्या संस्था, कंपन्या, प्राधिकरणे तसेच व्यक्तींना देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा दणका दिला आहे. आता अशा सर्व भाडेपट्ट्यावरील जमिनींच्या अधिकार अभिलेखात ‘कब्जेदार’ म्हणून…
