भटक्या श्वान नसबंदी कार्यक्रम: BMC चा २३ कोटींचा खर्च, पण संकट कायम!
मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी पुढील तीन वर्षांत १ लाख ३५ हजार श्वानांची नसबंदी करण्याचा कार्यक्रम हाती घेतला असून, यासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र, २०२४ च्या सर्वेक्षणानुसार शहरात ९०,७५७ श्वान असूनही २०३० पर्यंत ही संख्या ४.४८ लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.या कार्यक्रमात परळ पशुवैद्यकीय महाविद्यालयासह ९ संस्था सहभागी…
