बीएमसी बदल्यांमध्ये राजकीय वशीला: शहर अभियंता विभागातील यादीवरून गदारोळ, उपमुख्यमंत्र्यांच्या सर्वाधिक शिफारशी
मुंबई महापालिकेतील (BMC) शहर अभियंता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेसाठी राजकीय नेत्यांकडून आलेल्या शिफारशींची एक यादी समोर आल्याने प्रशासकीय व राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरटीआयच्या (RTI) माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार, कनिष्ठ अभियंत्यांपासून ते सहाय्यक व कार्यकारी अभियंत्यांपर्यंत तब्बल २२५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी सत्ताधारी महायुतीतील बड्या नेत्यांची शिफारस पत्रे जोडण्यात आली आहेत.या यादीत उपमुख्यमंत्री…
