प्रभातदेवीच्या ‘रुस्तमजी क्राउन’मधील अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा; ९ सदनिकांवर कारवाई
मुंबई:प्रभादेवी येथील प्रसिद्ध ६३ मजली ‘रुस्तमजी क्राउन’ या आलिशान गृहसंकुलातील मंजूर आराखड्याचे उल्लंघन आणि अनधिकृत बांधकामांविरोधात मुंबई महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. एफएसआय (FSI) नियमांचे उल्लंघन करून सदनिकांमध्ये करण्यात आलेले फेरबदल निष्कासित करण्यासाठी २४ ऑगस्टपासून महापालिकेकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.मंगळवारी देखील ही निष्कासन कारवाई वेगाने सुरू होती. लागोपाठ दोन दिवस चाललेल्या या…
