निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’ संपन्न; मुंबईत राजकीय हालचालींना वेग
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीविरोधात आणि मतदारांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या संयुक्त पुढाकाराने मुंबईत ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. मेट्रो सिनेमापासून सुरू झालेला हा मोर्चा मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर धडकला. या आंदोलनात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) या महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांनीही सहभाग घेतला.या मोर्चानिमित्ताने राज…
