शिवडीत ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत महापालिकेची धडक कारवाई;
मुंबई:पादचाऱ्यांना पदपथांवरून सुरक्षित व सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत शिवडी परिसरात मोठी निष्कासन कारवाई करण्यात आली आहे.मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाकडून डी. जी. महाजनी मार्ग आणि जेरबाई वाडीया मार्गालगतच्या पदपथांवर ही धडक मोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान प्रशासनाने पदपथांवरील अवैध कब्जा हटवत ७ अनधिकृत दुकाने, १५ तात्पुरते ताडपत्रीचे शेड, २…
