बुजुर्ग क्रीडापटू ऍलेक्स सिल्व्हेरा आणि सतिंदरपाल वालिया यांचा रेल्वेकडून गौरव
मुंबई – आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी बजावणाऱ्या आणि वयाची पंचाहत्तरी पार केलेल्या आपल्या माजी कर्मचाऱ्यांचा भारतीय रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध विभागीय कार्यालयांमध्ये यथोचित गौरव केला. याच कार्यक्रमांतर्गत विभागीय व्यवस्थापक जी. व्ही.सत्यकुमार यांनी धावक ऍलेक्स सिल्व्हेरा आणि हॉकीपटू सतिंदरपाल वालिया या दोन दिग्गजांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान…
