माथेरान मध्ये हाताने रिक्षा ओढण्याची पद्धत थांबवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली/महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरानला हाताने ओढल्या जाणाऱ्या रिक्षाबाबत सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. ही अमानवी प्रथा तातडीने बंद करायला हवी. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला रिक्षामधून ओढणे हे स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनीही सुरू राहणे म्हणजे संविधानासाठी खेदजनक आहे असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं. इको सेंसेटिव्ह झोन असल्याने या परिसरात वाहनांना बंदी आहे. त्यामुळे…
