निलेश दगडेचा स्पार्टन मुंबई श्रीवर कब्जा
मुंबई, दि. २ (क्री.प्र.)- तब्बल दहा वर्षे जेतेपदाच्या हुलकावणी नंतर प्रतिष्ठेच्या ‘स्पार्टन मुंबई श्री’ किताबावर परब फिटनेसच्या निलेश दगडेने आपले नाव कोरले. ग्रेटर बॉम्बे मॉडीबिल्डर्स असोसिशन आणि मुंबई सबर्बन बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या स्पार्टन मुंबई श्री २०२३ च्या स्पर्धेत निवेशने आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले. त्याने ७० आणि ८५ विणे वजनगटातील…
