शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या घरावर आणि गाडीवर हल्ला
ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांच्या घर आणि गाडीवर काही अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संबंधित प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय. संबंधित घटना ही कासार वडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही घटना काल सकाळी ८ वाजेच्या…
