४२ वर्षाच्या जनसेवेनंतर रविंद्र नागे सेवानिवृत्त : मंत्रालयाच्या उपहारगृहात बजावली सेवा
मुंबई : रविंद्र यशवंत नागे, पर्यवेक्षक हे मंत्रालय उपहारगृहामध्ये सन १९८२ साली वेटर या पदावर रुजू झाले व सन १९८४ पासून विधान भवन उपहारगृहामध्ये कार्यरत आहेत. विधान भवन दुसरा मजला उपहारगृह व वातानुकुलीत उपहारगृहांतर्गत पीठासीन अधिकारी, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, प्रधान सचिव, सचिव, सर्व समिती…
