केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी – केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
मुंबई – केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाला नसून अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्यातल्या वाढवण बंदरासाठी 76 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे . रेल्वे खात्यासाठीच्या तरतुदीत महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी 15 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने या अर्थसंकल्पाच्या रूपाने वाटचाल सुरु झाली आहे,असे प्रतिपादन केंद्रीय…
