संपूर्ण टोल माफीसाठी ठाणे – मुंबईच्या वेशीवरील ५० गृहनिर्माण सोसायट्यांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा
ठाणे : लोकसभेच्या निवडणुका सुरू असून अनेक ठिकाणी काही गावांनी वा समूदायाने मतदानावर बहिष्कार टाकल्याचं आपण ऐकतोय, त्यासाठी वेगवेगळी कारणंही असतात. पण ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या ओम नगर येथील रहिवाशांनी मात्र वेगळ्याच कारणामुळे मतदान करणार नसल्याचं जाहीर केलंय. तब्बल दहा हजार लोकसंख्या असलेल्या या परिसरातील रहिवाशांना टोल माफी मिळावी अशी मागणी करत हरी ओम…
