जळगावच्या अमळनेर मध्ये कोट्यवधींचा शिक्षक भारती घोटाळा
जळगाव : जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील वेगवेगळ्या संस्थांच्या शाळांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार शिक्षक, शालेय कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शिक्षण विभागाकडे केल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. बेकायदेशीपणे शिक्षकांची भरती, विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या दाखवून शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रकार या तक्रारीतून समोर आला आहे. अनेक संस्थाचालक, कर्मचारी तसेच शिक्षकांची फसवणूक झाल्याचा आरोपही या कर्मचारी आणि संस्था…
