मुंबईच्या सुशोभीकरणात स्ट्रीट फर्निचर घोटाळा – खुद्द कंत्राटदारांचेच मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई: शहराच्या सुशोभीकरणात स्ट्रीट फर्निचर घोटाळा झाला असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यात आता खुद्द सुशोभीकरण करणारे कंत्राटदारदेखील सामील झाले असून सुशोभिकरणाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. अशा प्रकारचे पत्रच साई सिद्धी इंफ्रा या कंत्राटदाराने मुख्यमंत्र्यांना लिहिले असून पुरावे सादर केले आहेत.साताक्रूज येथील मिलन सबवेच्या सुशोभीकरण करण्यासाठी साई सिद्धी इंफ्रा या कंपनीला पालिकेचे…
