पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपले
सांगली -रणरणत्या उन्हापासून हैराण झालेल्या कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यात अनेक भागांना आज अवकाळी पावसाने झोडपून काढले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने दुपारी हजेरी लावली. त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून अंगाची लाहीलाही होत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पारा चाळीशीच्या पार गेल्याने नागरिकांची अक्षरशः लाहीलाही सुरू आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज…
