शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोचण्याच्या तयारीत शेतकरी व सरकार यांच्यात संघर्ष अटळ
दिल्ली – शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ निषेध मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी मंगळवारी अंबाला येथील शंभू सीमेवर लावलेले बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर हरियाणा पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. दिल्ली गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस…
