स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
क्रांतिकारकांचे सेनापती, स्वातंत्र्यसैनिकांचे अग्रणी, हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्त्वज्ञ व सक्रिय हिंदू संघटक; क्रियाशील धर्मसुधारक व समाजसुधारक; प्रेरणादायी महाकवी आणि विज्ञाननिष्ठा व राष्ट्राची शस्त्रसज्जता यांबाबत प्रखर विचार मांडणारे विचारवंत!महाराष्ट्रात नाशिकजवळच्या भगूर गावी विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. तीव्र बुद्धिमत्ता, आक्रमी व साहसी वृत्ती, हृदयातील मानव्य अन् सर्जनशील कवित्व लाभलेले हे बालक वयाच्या १० व्या वर्षीच…
