बिपरर्जोय चक्रीवादळाने गुजरातमध्ये हाहाकार
पोरबंदर -महाभयंकर बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमधील नागरिकांच्या हृदयाची धडधड वाढवलीय. कारण ताशी तब्बल१४५किलोमीटर वेगाने धडकलेल्या चक्रीवादळानंतर गुजरातमध्ये लँडफॉल सुरु झालंय. लँडफॉलनंतर गुजरातमधील द्वारका, कच्छ आदी किनारपट्टीवर विध्वंस सुरू झाला आहे. रात्री उशिरापर्यंत लँडफॉल सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे एकून किती विध्वंस होईल, हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे सुरक्षित स्थळी हलवलेल्या ७४ हजार नागरिकांच्या मालमत्तेचं काय…
