देशात २ दिवसात ७ नवजात बालकांसह ३५ जणांचा अग्निकांडात मृत्यू
देशात दोन दिवसांत आगीच्या तीन दुर्घटना घडल्या. यात लहान मुलांसह ३५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी गुजरातच्या राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये भीषण आग लागली. काही तासांनंतर, दिल्लीच्या हॉस्पिटलमधील चाइल्डकेअर युनिटमध्ये आग लागली आणि तिसरी घटना दिल्लीतील एका निवासी संकुलात घडली. दोन वेगवेगळ्या शहरांमध्ये काही तासांच्या अंतराने या घटना घडल्या. पण या घटना नक्की कशामुळे…
