बिहारच्या मतदार यादीतून वगळलेल्या ६५ लाख मतदारांचा तपशील देण्याचे निवडणूक आयोगाला न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली/सुप्रीम कोर्टाने बुधवारी निवडणूक आयोगाला सांगितले की, त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर असलेल्या बिहार राज्यातील मतदार यादीच्या मसुद्यातून वगळलेल्या सुमारे ६५ लाख मतदारांचा तपशील ९ ऑगस्टपर्यंत उपलब्ध करून द्यावा.न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती उज्जल भुईया आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाच्या वकिलांना सांगितले की, त्यांनी वगळलेल्या मतदारांचा तपशील सादर करावा, जो डेटा यापूर्वीच राजकीय पक्षांसोबत…
