निवडणुकीच्या कामातून पालिका सेवेतन परतलेल्या कामगारांचे वेतन रोखले
मुंबई : महानगरपालिकेतील हजारो कामगार – कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यार्थ तैनात करण्यात आले होते. मात्र, पालिकेचे ५८६ कर्मचारी अद्यापही पुन्हा सेवेत रुजू झालेले नाहीत. दरम्यान, पालिकेच्या ४६ कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात आले आहे. त्यामुळे अन्य कर्मचारी लवकर मूळ सेवेत परतण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.महा पालिकेच्या सुमारे ६५ हजार कामगार – कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यार्थ पाठविण्यात आले…
