आमच्या सरकारने दीड वर्षात शेतकऱ्यांना ४४ हजार २७८ कोटींची मदत केली – मुख्यमंत्री
नागपूर : विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांची माहिती दिली. दीड वर्षामध्ये ४४ हजार २७८कोटींची विक्रमी मदत केली असल्याचंं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. अवकाळी पाऊस, गारपीट आणि बळीराजाच्या समस्यांसंदर्भात विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अल्पकालिन चर्चा उपस्थित केली होती. या घोषणा करताना एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली…
