पद्मश्री विनोद दुआ यांच्या निधनाने-भारतीय पत्रकारितेची मोठी हानी
मुंबई, शनिवार : आपल्या प्रभावी शैलीमुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर आपला असाधारण ठसा उमटविणारे पत्रकार पद्मश्री विनोद दुआ यांच्या निधनाने भारतीय पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या. दूरदर्शन आणि एनडीटीव्हीमध्ये काम करत असताना विनोद दुआ यांनी आपली निर्भीड आणि नि:पक्षपाती पत्रकारिता…
