विवेकी कीर्तनकार – घडविण्याची धडपड!
पाचवीच्या दिवशी आजी ह.भ.प. तुळसाबाई हिने गळ्यात तुळशीची माळ घातली. लहानपणी मुलांना खेळणी दिली जाते. मी बसायला लागलो तेव्हा आजीनेच छोटा टाळ गळ्यात अडकवला. बोबडे बोल येऊ लागले. आजीने पहिला शब्द “विठ्ठल विठ्ठल ” बोलायला शिकवला. गावातील पारावर चालणारे कीर्तन, भजन, हरिपाठ लहानपणीच आजीच्या मांडीवर ऐकले. वाचायला यायला लागले तेव्हा पहिला ग्रंथ हातात पडला हरिपाठ,…
