स्वतः ऐवजी देशाचा विचार सर्वप्रथम केला तर सर्वच प्रश्न मार्गी लागतील ; भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारणासाठी श्री. प्रल्हाददादा पै यांची महत्वपूर्ण सूचना ; ‘गुरुजी’ चे प्रकाशन करतांना मांडला जीवनविद्या मिशनचा सिद्धांत मुंबई, दि. (विशेष प्रतिनिधी) : आपल्या देशात भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारण योग्य पद्धतीने अंगिकारण्यात आले आणि स्वतः ऐवजी देश हा सर्वप्रथम असा विचार सर्वच लोकप्रतिनिधींनी केला तर विश्वभरात भारताला महासत्ता होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, यासाठी जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु वामनराव पै यांनी मांडलेला सिद्धांत हाच सर्वोत्तम आहे, असे सुस्पष्ट प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद दादा पै यांनी केले. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी लिहिलेल्या ‘गुरुजी’ या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन बोरीवली येथील जीवनविद्या मिशनच्या मुख्य कार्यालयात मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद दादा पै यांच्या शुभहस्ते एका छोटेखानी कौटुंबिक आणि उत्साहवर्धक वातावरणात करण्यात आले. त्यावेळी श्री. प्रल्हाददादा वामनराव पै यांनी देशातील संपूर्ण राजकारणात भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त वातावरण कसे निर्माण होईल, यासाठी जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु वामनराव पै यांचा सिद्धांत, त्यांचे तत्त्वज्ञान किती समर्पक आणि चपखलपणे योग्य आहे ते समजावून सांगितले. सदगुरुंनी सर्वात आधी देश आपल्या डोळ्यासमोर अग्रस्थानी ठेवला. देशाचे भले झाले तर आपोआप आपले भले होईल. आपण जे कार्य करतो हे देशासाठी समजून करावे. देशाचे भले करणे हेच उद्दिष्ट समोर ठेवणे आवश्यक आहे. ‘नेशन फर्स्ट’ ही संकल्पना पुढे न्यायला हवी. देश सुधारला, देशाची प्रगती झाली तर पर्यायाने आपली प्रगती निश्चितच होईल. देश आणि समाज आपण नेहमीच आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, समाजाशी आपली बांधिलकी आहे आणि समाजाची प्रगती म्हणजे पर्यायाने देशाचीच प्रगती, देश, समाज जर पुढे गेला तर आपणही पुढे जाऊ शकतो. मी, नको आम्ही पण नको तर ‘सर्व ‘ हे महत्त्वाचे आहे, सर्वांमध्ये आपणही आलोच. जीवनविद्या मिशनच्या विश्वप्रार्थने मध्ये सर्वांचे भले चिंतले आहे. सर्वांच्या भल्यात आपलेही भले आहे. निवडणुकीच्या राजकारणावर कटाक्ष टाकतांना श्री. प्रल्हाददादा पै म्हणाले की, आपण पक्षाच्या चिन्हावर मतदान करतो. पक्षाला निवडून देतो. मग अशावेळी जर एखाद्या लोकप्रतिधीने पक्ष सोडला तर त्याची निवड रद्दबातल करण्यात आली पाहिजे आणि त्या लोकप्रतिनिधीच्या जागी पक्षाने दुसऱ्या योग्य व्यक्तीला नियुक्त केले पाहिजे, ‘नॉमिनेट’ केले पाहिजे. म्हणजे मग पक्षांतराला आळा बसू शकेल. पक्ष हाच महत्त्वाचा असल्याने पक्षाने दुसऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती केली तर खर्च सुद्धा वाचू शकेल. भ्रष्टाचार या प्रवृत्तीला आळा बसू शकेल. लोकशाहीच्या चारही स्तंभांनी प्रामाणिकपणे, जबाबदारीने कार्यरत राहून देश हाच केंद्रबिंदू मानून देशाच्या विकासाचा द्रुष्टिकोन बाळगला तर भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त वातावरण देशात निर्माण होण्यास चालना मिळेल, असेही श्री. प्रल्हाददादा पै यांनी नीक्षून सांगितले. यावेळी योगेश वसंत त्रिवेदी यांनी श्री. प्रल्हाददादा पै यांचा शाल, श्रीफळ देऊन तर श्री. प्रल्हाददादा पै यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ‘आहुति’चे संपादक गिरीश वसंत त्रिवेदी व कार्यकारी संपादिका सौ. मनीषा त्रिवेदी यांनी ‘आहुति’चे विविध विशेषांक आणि ‘शेतीजन्य’ची भेट श्री. प्रल्हाददादा पै यांना सादर केली. जीवन विद्या मिशन ग्राम समृध्दी अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवित आहे त्याच्याशी सुसंगत शेतीजन्य हा उपक्रम कौतुकास्पद आहे.असे ते म्हणाले.सद्गुरु वामनराव पै यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. जीवनविद्या मिशनचे विश्वस्त सचिव दिपक काळे, प्रा. सौ. नयना रेगे व अन्य पदाधिकारी, नामधारक, सौ माया योगेश त्रिवेदी, सौ देवांशी प्रशांत त्रिवेदी , चि. वेद प्रशांत त्रिवेदी, राजा शिवछत्रपती परिवारच्या मुंबई संपर्क प्रमुख रेखाताई बोऱ्हाडे यावेळी उपस्थित होते. विश्वप्रार्थनेने प्रकाशन समारंभाची सांगता करण्यात आली.
Similar Posts
लोकशाही मध्ये मताची ताकत ओळखा आणि मतदार यादीत आपले नाव नोंदवा- भवानजी
मुंबई/ लोकशाही मध्ये निवडणूक प्रक्रिये मधून सरकार बनत असते त्यामुळे आपल्या मताची ताकत खूप मोठी आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने मतदार यादीत आपले नाव नोंदवून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी सर्वांना खास करून तरुण पिढीला आव्हान केले आहेमतदान जागृती बाबत बोलताना बाबूभाई नी सांगितले की नमाज…
सर्व जिल्हा नियोजन समित्यांवरील विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द
मुंबई – जिल्हा नियोजन समितीच्या संदर्भात राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य म्हणून राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या त्वरित प्रभावाने (तत्काळ) रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आता केवळ आमदार आणि खासदारांनाच बसता येणार आहे, त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांना आपल्या इच्छांना…
मुख्यमंत्री निधीतून १ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून पत्रकार श्री.पंढरीनाथ सावंत यांना केला सुपूर्द
ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत हे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय निकटचे सहकारी राहिलेले आहेत, तसेच शिवसेनेचा आवाज बुलंद करणाऱ्या – मार्मिक च्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. मात्र, प्रकृतीस्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांना बसविण्यात आलेल्या पेस मेकरची बॅटरी बदलायची आहे. त्याकरिता मोठा खर्च अपेक्षित आहे, असे लक्षात आले. त्यांचे कार्य आणि शिवसेनेसाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन…
एस टी कामगारांना आणखी तीन दिवसांची मुदत
मुंबई/ विलीनीकरण करण्याच्या मुद्यावर अडून बसलेल्या एस ती कामगारांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी आणखी तीन दिवसांची मुदत दिलेली आहे. या तीन दिवसात ते कामावर हजर झाले नाही तर त्यांच्यावर एस्मा अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहेकलानील परब यांनी एस टी क्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली आणि संपकरी कर्मचाऱ्यांना आणखी तीन दिवसांची मुदत दिली…
देशात २९,२७३ कंपन्या बनावट -जीएसटी नोंदणी विरोधी मोहिमेत धक्कादायक खुलासा
नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबर २०२३ पर्यंत जीएसटी अधिकाऱ्यांनी देशात २९०००हून अधिक बनावट कंपन्यांचा पर्दाफाश केला. या कंपन्या ४४०१५ कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट दाव्यांमध्ये गुंतल्या होत्या. या कंपन्या महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, हरियाणासह अन्य राज्यांत पकडल्या गेल्या.बनावट जीएसटी नोंदणीविरोधात सरकारने सुरू केलेल्या मोहिमेचा परिणाम दिसून येत…
साताऱ्यातील यशवंत सहकारी बँकेत ११२ कोटींचा घोटाळा भाजपा नेता अडचणीत
सातारा/यशवंत को-ऑपरेटीव्ह बॅंकेच्या लेखापरिक्षणात बोगस कर्ज प्रकरणाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याची बाब समोर आली. त्यानंतर सनदी लेखापाल मंदार शशिकांत देशपांडे यांनी यशवंत बॅंकेचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, कराड शाखेतील कर्ज विभागाचे शाखा व्यवस्थापक आणि शेखर चरेगावकरांच्या नातेवाईकांविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यशवंत को-ऑप. बँक लि.कराड या बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, ५…
