घाटकोपर ता 31 , बातमीदार-डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा यांच्या माध्यमातून सोमवार पासून पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत महाड , पोलादपूर व चिपळून या ठिकाणी दररोज 1500 हुन अधिक श्रीसदस्य विविध ठिकाणाहून स्वच्छता अभियानात सामील होत आहेत. महाड मध्ये पाण्याचा प्रवाह शिरल्याने गाळ , माती , चिखल , कचरा , वाहने , घरातील वस्तू , किराणा दुकानातील माल हा वस्तीत व रस्त्यावर पसरलेला आहे. या सर्व वस्तू उचलण्यापासून ते रस्त्यावरती साचलेला गाळ यांची विल्हेवाट लावण्यासाठी पूरग्रस्त भागामध्ये स्वच्छता अभियानाचे नियोजन प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी (पद्मश्री पुरस्कार सन्मानित ) तसेच प्रतिष्ठाणचे विश्वस्त रायगड भूषण श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. महाड येथील पूरग्रस्त भागात महाड जिल्हा परिषद शाळा , ग्रामपंचायत , आयटीआय , रुरल हॉस्पिटल समोरील ट्रामा केअर सेंटर , महाड एसटी स्थानक , बिरवाडी , चवदार तळे , आंबेडकर स्मारक आदी ठिकाणी मुंबई उपनगरातून आलेल्या श्रीसदस्यांनी स्वच्छता केली. या मोहिमेत प्रतिष्ठाणचे श्रीसदस्य स्वतःचा जेवणाचा डबा , पाण्याची बॉटल , तसेच सॅनिटायझर , मास्क यांचा वापर करत पूरग्रस्त भागात स्वच्छतेचे काम करत आहेत. डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा मार्फत सातत्याने समाजउपयोगी उपक्रम राबविले जातात. त्यात प्रामुख्याने वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन , आरोग्य शिबीर , रक्तदान शिबीर , दाखले वाटप , शैक्षणिक साहित्य वाटप , अंध व मुखबधिर विद्यार्थाना मदत , उद्योजकता व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर , पाणपोई बसथांबे , आपतग्रस्तांना मदत यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. 20 जुलैच्या महापुराने झालेली अस्वच्छता संपूर्ण स्वच्छ करण्यासाठी प्रतिष्ठाणने नियोजन केले आहे. या अभियानासाठी महाड नगर परिषद पोलादपूर व चिपळूण प्रशासनाने सहकार्य केले आहे. प्रतिष्ठाणचे हे स्वच्छता अभियान पूरग्रस्त भाग पूर्णपणे स्वच्छ होई पर्यंत सुरूच राहणार आहे.
Similar Posts
मुंकुद लिमिटेड अस्थापनातील दडपशाहीला उत्तर दिले जाईल – विश्वास उटगी
मुकंद ली. या कंपनीने एम आय डी सी च्या मालकीची कळवा येथे असलेली लिझ वर भुसंपदित कायद्याखाली मिळालेली जमीन – ‘करण्याचा बेकायदेशीर घाट घातलेला आहे आणि त्याला कळवा मुकद एम्प्लांईज संघटनेने विरोध करून त्याबाबत मा. उच्च न्यायालयात रीट पीटिशन क्रमांक (st. 6081of 2021) दाखल केलेला आहे. सदर बेकायदेशीर जमीनविक्री ही येथील कामगार, महाराष्ट्र सरकार…
केवडिया प्रमाणेच पोंभूर्ले सुद्धा जगाच्या नकाशावर आणू या ; योगेश वसंत त्रिवेदी यांचे कळकळीचे आवाहन ; सर्वच पत्रकार संघटनांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या भव्य स्मारकासाठी एकत्र यावे
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : इच्छाशक्ती असली की एखादे काम पूर्ण करता येते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक अवघ्या चार वर्षांत उभे करुन दाखवून दिले आहे. २०१४ पूर्वी केवडिया हे कुणाला माहित होते ? स्टेच्यूऑफ युनिटी च्या माध्यमातून जर केवडिया जगाच्या नकाशावर येऊ शकते तर मग ज्या आचार्य…
मार्चमध्ये महाराष्ट्रातून २२०० मुली बेपत्ता
मुंबई – एकीकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोख असल्याचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांसाठी एक चपराक लगावणारी बातमी आहे. मार्च महिन्यात राज्यातील तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. सरासरी पाहिलं तर रोज ७० मुली राज्यातून बेपत्ता होत असल्याचं समोर आलं आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत३९० ने वाढ झाली असून ही आकडेवारी…
महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कोषरी विरुद्ध संतापाची लाट
मुंबई – महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल काहींना काही वादग्रस्त बोलणाऱ्या राज्यपाल कोषारिनी.शुक्रवारी मुंबई आणि महाराष्ट्रावर केलेल्या वक्तव्याने पुन्हा चर्चेत आले आहेत. ‘गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती राहणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी…
दिशा सालियन कुटुंबाची राष्ट्रपतींकडे धाव
नवी दिल्ली : आरोप-प्रत्यारोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून दिशा सालियान मृत्यू प्रकरण चर्चेत आहे. आता एक नवीन माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्यावर कारवाई करावी,अशी विनंती दिवंगत दिशा सालियानच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आमच्या मुलीच्या मृत्यूचे राजकारण केले जात आहे, असा आरोप देखील दिशाच्या…
मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चा
मुंबई – लव्ह जिहाद ,आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी आज हिंदुत्ववादी संघटनांनी मुंबईत जण आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या : सकल हिंदू समाजाकडून मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चालासुरुवात झाली आहे. शिवाजी पार्क इथून या मोर्चाला सुरुवात झाली अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या लव्ह जिहाद…
