लोकमान्य टिळक रुग्णालयात HMIS प्रायोगिक अंमलबजावणी; बाह्यरुग्ण नोंदणी व डिजिटल पेमेंट सेवा सुरू — प्राजक्ता वर्मा भेट
लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालयात ‘हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम’ (HMIS) ची प्रायोगिक अंमलबजावणी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात बाह्यरुग्णांची डिजिटली नोंदणी आणि शुल्क भरण्यासाठी डिजिटल पेमेंटची सुविधा रूग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे रूग्णांना रोख पैसे व सुट्टे देण्याची अडचण कमी होऊन व्यवहार कॅशलेस झालेले आहेत. या पथदर्शी प्रकल्पाची पाहणी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती…
