मुंबईत पदपथ अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोझर कारवाई करा -आयुक्त अश्विनी भिडे
मुंबई :मुंबईतील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठी मोहीम हाती घेतली असून, अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमणे आणि पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या सर्व बाबींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट अभियानाअंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरातील ३२० किलोमीटर लांबीचे पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहेत.महापालिका मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त भिडे यांनी सर्व…
