पालिकेची अनधिकृत फेरीवाल्या विरुद्धची मोहीम तीव्र! अधिकृत फेरीवाल्यांना क्यू आर कोड आधारित प्रमाणपत्र देणार
मुंबई/गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण मुंबईत रस्त्यावर ठाण मांडून बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात पालिकेने कारवाईची तीव्र मोहीम सुरु केली आहे. अनेक भागांमध्ये फेरीवाल्यांना रस्त्यांवर बसून दिले जात नाही. मात्र, पालिकेच्या या कारवाईचा जोर काही दिवसांत आपोआप ओसरेल या भ्रमात असणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांना मोठा झटका बसणार आहे. कारण मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात फेरीवाल्यांसाठी नवे धोरण जाहीर करण्यात आले आहे….
