परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लिम महापौर
परभणी/ महाराष्ट्रात इतरत्र सत्तेसाठी सर्वच पक्षांनी आपल्या मूळ ध्येय धोरणाला तिलांजली दिलेली असली तरी परभणीत मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेस बरोबर हातमिळवणी करीत महाविकास आघाडी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले.परभणीत महापौर पदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेने भाजपाचे मनसुबे उधळून लावले.त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल सय्यद ख्वाजा हे महापौर बनले तर काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौर बनले आहेत.परभणी महानगरपालिकेच्या…
