भाजपा खंबीरपणे भूमिपुत्रांच्या पाठीशी रहाण्यास कटिबध्द
मुंबई/आज भलेही मुंबई महानगर जगातली एक मोठी बाजारपेठ आणि देशाची आर्थिक राजधानी असली तरी इथला जो मुळ रहिवाशी भूमिपुत्र आहे त्याच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक तितके प्रयत्न झालेले नाही .त्यामुळे आजही मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,आरेचे जंगल आणि संपूर्ण मुंबईच्या आदिवासी पाड्यांमध्ये राहणारे आदिवासी बांधव,समुद्रावर उपजीविका असलेले आणि मुंबईच्या समुद्र किनारी असलेल्या कोळी वाड्यांमध्ये राहणारे कोळी…
