नायर रूग्णालय दंत महाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘सर्वोत्तम दंत रूग्णालय’ म्हणून गौरव
दंत उपचार सेवा क्षेत्रातील योगदानाबद्दल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका स्थित ‘पिएरी फॉचर्ड अकॅडमी’ मार्फत दिला जाणारा अत्यंत मानाचा पुरस्कार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला आहे. ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम दंत रुग्णालय’ या श्रेणीत हा पुरस्कार देण्यात आला आहे. पिएरी फॉचर्ड अकॅडमीमार्फत श्रीलंकेतील कोलंबो येथे दंत आरोग्याशी संबंधित विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते….
