शिवाजी पार्क आंदोलनाप्रकरणी सीजेपीवर गुन्हा दाखल
मुंबई:मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आणि मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेविरुद्ध (SIR) मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) वतीने निदर्शने करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व पोलिसांकडून स्पष्ट परवानगी नाकारण्यात आलेली असतानाही, आयोजकांनी न जुमानता हे आंदोलन केले.या आंदोलनादरम्यान सार्वजनिक वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होणे, विनापरवानगी लाऊडस्पीकरचा वापर करणे आणि…
