मुंबई झोपु.योजना राबवणार्या एस.आर.ए च्या अधिकाऱ्यांनी या योजनेत अपात्र ठरलेल्या झोपडी आणि गाळेधारकबाबतची माहिती लपवून ठेवल्यामुळे मुंबईतील लाखों झोपडपट्टीवासीयांवर बेघर होण्याची पाळी आली आहे.
मुंबई एस.आर.ए.च्या अधिकार्यांचे हे पाप उघडकीस आल्यानंतर हवालदिल झालेल्या झोपडपट्टीवासीयांच्या मदतीला केंद्रीय सामाजिक,न्याय अधिकारिता,राज्यमंत्री रामदास आठवले आले असून मी एकही झोपडीधारकाला बेघर होऊ देणार नाही असे आश्वासन त्यांनी म्हाडा मध्ये झालेल्या बैठकीतील पत्रकार परिषदेत दिले त्यामुळे मुंबईतील लाखो झोपडपट्टीवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे व सरकारी अधिकार्यांचा गलथानपणा आणि अक्षम्य असा निष्काळजीपणा यापूर्वहि अनेक वेळा जनतेसाठी…
