अनाधिकृत लॉजवर पालिकेची धडक कारवाई; चेंबूर-मानखुर्दमध्ये साहित्य जप्त, वीज-पाणी खंडित
मुंबई पूर्व उपनगरातील चेंबूर आणि मानखुर्द परिसरात अनाधिकृतपणे चालवल्या जाणाऱ्या लॉजवर मुंबई महानगरपालिकेच्या एम-पूर्व विभागाने 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी दोन दिवसांची धडक कारवाई केली. या कारवाईत अनाधिकृत लॉजमधील साहित्य जप्त करण्यात आले असून त्या ठिकाणी वीज व पाणी जोडण्या खंडित करण्यात आल्या.26 नोव्हेंबर रोजी घाटकोपर-मानखुर्द जोडमार्गावरील टी-जंक्शन, आंबेडकर नगर, मंडाळा आणि मानखुर्द परिसरातील एकूण…
