पश्चिम बंगालमध्ये अभ्यासक्रमात बदल; मुघल इतिहासाऐवजी शिवाजी महाराज आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा समावेश
पश्चिम बंगाल — राज्य सरकारने केजी (पूर्व-प्राथमिक) ते पीजी (पदव्युत्तर) पर्यंत अभ्यासक्रमात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या धोरणानुसार परंपरागत पाश्चिमात्य किंवा मुघल-केंद्रित इतिहासाऐवजी राष्ट्रवादी भारतीय इतिहासाला प्राधान्य दिले जाईल. बैठकीत सांगितल्याप्रमाणे कौटिल्य, सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी यांसारख्या हिंदू शासकांच्या गाथांना पाठ्यपुस्तकात अधिक स्थान दिले जाणार आहे, तसेच श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे कार्यही…
