निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पैशाचा पाऊस
नाशिक- महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात आदर्श आचरसंहिता लागू झाली आहे. मात्र, असं असताना राज्यात अनेक ठिकाणी पैशांचा धुमाकूळ सुरु आहे. आत्तापर्यंत पुणे आणि मुंबईत दोन ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पैशांच्या बॅगा जप्त केल्या होत्या. आता नाशकातही मोठं घबाड सापडलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये दोन ठिकाणी सापडले लाखो रुपये पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत….
